Ad will apear here
Next
देशासाठी पदक मिळवल्याचा आनंद अवर्णनीय : डॉ. निशिगंधा पोंक्षे
मुलाखतीत बोलताना डॉ. निशिगंधा पोंक्षे. सोबत मुलाखतकार पुरुषोत्तम पाध्ये.

रत्नागिरी :
‘कझाकस्तानमध्ये यंदा झालेल्या आशिया कप स्पर्धेत बायथले (Biathle) आणि ट्रायथले (Triathle) स्पर्धेत मी ५५ वर्षे गटात भाग घेतला. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे अशा प्रकारे क्षमतेचा कस लावणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेत भारतासाठी मी दोन सुवर्णपदके मिळवू शकले. याचा आनंद अवर्णनीय आहे,’ अशा शब्दांत डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत डॉ. पोंक्षे यांनी आतापर्यंत ३६ सुवर्णपदके पटकावली आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीदिनी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘गौरव स्त्री-पर्वाचा’ या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरुषोत्तम पाध्ये यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

‘कझाकस्तानच्या आशिया कप २०१९ बायथले, ट्रायथले स्पर्धेत भारतासह श्रीलंका, इटली, रशिया या देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा वेगळी होती. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे असा क्षमतेचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके मिळवली. ५१ वर्षीय रशियन स्पर्धकांनी स्पर्धा सोडली; पण मी स्पर्धा पूर्ण केली,’ असे डॉ. पोंक्षे म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ‘सोबतच्या रशियन स्पर्धकांनी दुसऱ्या फेरीत स्पर्धा सोडली. मीसुद्धा तिसऱ्या फेरीत दमले. स्टॅमिना संपला; पण प्रशिक्षकांनी आणि भारतीय सहकाऱ्यांनी ओरडून सांगितले, ‘कम ऑन निशि, रन फॉर नेशन.’ त्यानंतर मी उर्वरित दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या व रशियन स्पर्धकांनी येऊन मिठी मारली. ‘धिस इज इंडिया’ असे त्यांनी म्हटल्यावर अभिमान वाटला. बक्षीस घेताना भारताचा ध्वज घेतला आणि आनंद झाला. हे सारे शब्दांत मांडणे अवघड आहे.’

डॉ. पोंक्षे यांचा विशेष सत्कार करताना अॅडड. विलास कुवळेकर. सोबत श्रुती दात्ये, चंद्रकांत हळबे, माधव हिर्लेकर.

डॉ. पोंक्षे म्हणाल्या, ‘रन-स्विम-रन या बायथले स्पर्धेत १२०० मीटर धावणे, थंड पाण्यात २०० मीटर पोहणे आणि पुन्हा १२०० मीटर धावायचे होते. दुसऱ्या ट्रायथले स्पर्धेत शूटिंग व ५० मीटर पोहणे आणि धावणे हे चार वेळा करायचे होते. या दोन्हींतही सुवर्णपदक मिळाले.’

‘माझ्या या यशात सासूबाई, पती, आई यांचा मोलाचा वाटा आहे. माझी आई १९६०मध्ये दुचाकी, चारचाकी चालवायची. चौथी-पाचवीत तिने टिळक टँकमध्ये पोहायला पाठवले. नंतर खडकवासला बॅकवॉटरमध्ये वॉटर सर्फिंग, गोव्यात स्कूबा डायव्हिंग शिकले. पॅडी कोर्स करणारी मी रत्नागिरीतील पहिली. लग्नानंतर सासूबाईंनी पाठिंबा दिला. ‘तुला हवं ते कर,’ हा विश्वा स दिला. समुद्र, पाणी आवडत असल्याने पतीने मालगुंड येथे किनाऱ्यावर जागा दिली. त्यामुळेच मी माझे पॅशन जपू शकले. योग्य वेळी गुरू डॉ. देशमुख काका यांनी मंत्र दिला. आपण शिकतो, पैसे कमावतो; पण मरण कधी तरी येणार आहे. म्हणून वानप्रस्थाश्रमाची तयारीही करायला हवी. म्हणूनच मानसिक शांती म्हणजे ‘ट्रँक्विलिटी’ या नावाचे हॉटेल मालगुंड येथे सुरू केले. अशा विविध आघाड्यांवर काम करत आहे,’ असे डॉ. पोंक्षे यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSXCG
Similar Posts
महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया असल्यास लोकांच्या समस्या ममत्वाने सोडवू शकतात रत्नागिरी : ‘अनेक क्षेत्रांत महिलांना आरक्षण द्या, असे म्हटले जाते; पण गुणांना आरक्षणाची गरज नसते. गुण व कर्तृत्व असेल तर प्रतिकूलतेवर मात करून महिला गौरवास्पद कामगिरी करतात. त्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया विराजमान झाल्यास ममत्व, वात्सल्य, करुणेने त्या लोकांच्या समस्या
रत्नागिरीत रुजतोय ‘पेंटॅथलॉन’ क्रीडा प्रकार; ‘बायथले’मध्ये रत्नागिरीच्या आठ विद्यार्थ्यांचे यश रत्नागिरी : पेंटॅथलॉन हा ऑलिम्पिक स्पर्धेतील क्रीडाप्रकार आता रत्नागिरीतही रुजू लागला आहे. या प्रकारातील बायथले प्रकाराच्या स्पर्धेत रत्नागिरीतील आठ मुले-मुली यशस्वी झाल्या आहेत. ‘मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरी’च्या वतीने या विद्यार्थ्यांचा आणि रत्नागिरीत हा क्रीडा प्रकार आणणाऱ्या डॉ. निशिगंधा पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला
‘स्त्रियांनी कौशल्ये शिकून किमान चौघींना नोकरी द्यावी’ रत्नागिरी : ‘स्त्री सुसंस्कृत असेल, तर तिच्यामुळे मुले व घर सुधारते. त्यामुळे स्त्रीने व्यवसाय केला, तर सारे कुटुंबही या व्यवसायात मदत करते. बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थिनी, गृहिणी, मुली शिकल्यानंतर त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू करून किमान चार जणींना नोकरी द्यावी. म्हणजे या केंद्राचा उद्देश सफल होईल
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे शोभना नारायण विद्यालयास पुस्तकभेट नानिवडे : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे नानिवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील शोभना नारायण विद्यालयाला तीन हजार रुपयांची पुस्तके, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा आणि चरित्र पुस्तके देण्यात आली. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी प्रदान केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language